Type Here to Get Search Results !

दांडेगावचे सुपुत्र रंगराव साळुंके यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

 



वसमत तालुक्यातील दांडेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत क्रिडा शिक्षक रंगराव बाजीराव साळुंके यांना महाराष्ट्र शासनाचा २०२४-२५!चा

“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या ३० वर्षांच्या अखंड शिक्षण सेवेचा, क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा , कबड्डी व धनुर्विद्यातील या क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी मुंबईत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. रंगराव साळुंके यांचे शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. आर. बी. साळुंके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लिटल किंग्ज शाळेचे अध्यक्ष प्रा. नामदेव दळवी, केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. प्रा. पी. एन. बहिरे, प्रा . डॅा . काशीनाथ चव्हाण , माधव इंगोले, प्रा. आत्माराम राजेगोरे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments